आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं येतात आणि कधी कधी अशा काही परिस्थिति येतात. जिथे तुमची चूक नसते तरी देखील तुम्हाला बोलणी ऐकावी लागतात. कधी कधी आपल्या प्रिय आणि सगळ्यात जवळच्या व्यक्तीच्या आनंदात येणारा अडथळा आपणच असतो. अशा वेळी होणार दुख कधी ही न विसरता येणार आणि सहन ही न होणार  असत.  अशा वेळी  काही निर्णय घेणे   हे कठीण असतात पण ते घ्यावे अस माझ मत आहे. 

जर एखाद्याच्या आयुष्यात ,त्याच्या आनंदात आपण एक प्रकारचा अडथळा होत असू तर कोणती ही तक्रार न करता  आपण त्यांना त्यांच आयुष्य जगू द्याव. आता त्यांना  कारण विचारव  की नाही हा ज्याचा त्याचा वायक्तिक प्रश्न पण माझ्या मते  कारण विचारव पण  जर समोरच्या व्यक्तीची सांगण्याची  इच्छा नसेल तर  आग्रह  देखील  करू नये. जर कारण असत तर नक्कीच ते चर्चा करून त्या व्यक्तीने सोडवण्याचा प्रयत्न केला असता पण कधी कधी अस होत नात्यात गरजेपेक्षा जास्त जवळीक  ही नात  उलघडण्या आधी आली तर कोणा तरी एका  व्यक्तीची घुसमट होऊ लागते.  अशी  जर घुसमट दिसू लागली की थोडा दुरावा आणावा समोरच्या व्यक्तीला एक मोकळा श्वास घेऊ द्यावा तो पुनःह बहरतो आणि पुनःह नात्याला जगवण्याचा विचार करू लागतो. 

असो, तर विषय होत   एखाद्याचा आनंदतला अडथळा आपण   होत असू तर  काय कारव?  त्या वेळी देखील त्या व्यक्तीला एकट सोडव  त्या व्यक्तीला मोकळा श्वास घेऊ द्यावा जगू द्याव.  त्या व्यक्तीशी  नात तोडू नये पण आपण आपल्यामुळे  त्या व्यक्तीची  घुसमट होणार नाही, त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जेवढ बोलण सोप्पं तेवढीच कृती कठीण होते, पण यावर दूसरा पर्याय मला तरी अद्याप सापडला नाही.  हे अस करण्याच कारण देखील  सांगतो. 

माणूस हा चुकांचा पुतळा कधी मोहत अडकून   तर  कधी  मूर्खपणा  करतो आणि नको असलेल्या नात्याला ही होकार देतो.  पण कालांतराने  त्याला कळत की हे नात किंवा ही  जवळीक चुकीची म्हणून तो त्या अडकलेल्या आणि अवघडलेल्या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी  नकळत  आपल्याला  त्रास देऊ लागतो.   पण तो माणूस चुकीचा नसतो  फक्त काही भावनिक  विचारांमध्ये अडकून हे सगळ करत असतो. म्हणून त्याला अशा वेळी जाब विचारू नये कारण तो तेच  उत्तर देणार ज्याने आपल्याला  त्रास होईल.  जे आपल्याला ही नको हव असत आणि त्याला ही  तो त्रास देण्याची इच्छा नसते.  म्हणून त्याला जाब न  विचारता त्या व्यक्तीला थोडा वेळ एकट सोडव म्हणजे तो एक योग्य निर्णय घेण्याच्या मनस्थित पुनः ह येईल. 

अशा गोंधळलेल्या व्यक्तीला जाब का विचारू नये हे तर सांगितल आता त्या व्यक्तीशी नात का तोडू नये.  अशी गोंधलेली व्यक्ति   बहुतेक वेळ चुकीचे निर्णय घेते.   आणि जर आपण देखील नात तोडल तर त्याला जे एक हक्काचा आणि स्पष्ट  उत्तर देणार व्यक्ति तो गमावून बसतो. त्या व्यक्तीला आपली गरज ही भासते पण  नात तुटल्यामुळे आणि  त्यात आलेल्या दुराव्यामुळे तो पुनःह बोलण्यात चाचरतो.   पण तेच जर नात तुटल नसेल फक्त थोड सैल सोडल असेल तर तीच व्यक्ति विश्वास आणि आशेच्या आधारावर परत येते.   ती व्यक्ति आपल मन मोकळ करते आणि पुनःह ते नात जे कुठे तरी तोडून टाकणार होतो त्याला नवी पालवी फुटू लागते. अस होऊ शकत नात्याच नाव  बदलू शकत आणि कदाच जवळीक होण्यासाठी वेळ लागू शकतो पण त्यात असलेला विश्वास आणि जिव्हाळा त्या  दोन्ही व्यंकत्तीना  त्या बदलाची जाणीव होऊ देत नाही.  नात तोडून दोन्ही बाजू दुखी  राहतात  पण त्याला थोड वेळ दिला तर आयुष्याभर दुखी राहण्यापेक्षा एक नव नात आणि नवी व्यक्तीची साथ भेटण्याची संधी जास्त असते. 

आता काही नवीन प्रश्न  पडले असतील की आपल्या स्वाभिमानाच  काय?  आणि  समोरच्या व्यक्तीने  लाथडल तर काय?   आता  पहिले तर हे  स्पष्ट करतो की हे वयक्तिक माझ  मत आहे जे कदाच तुम्हाला पटणार नाही पण  जस तुमच्या मते तुम्ही योग्य तसच माझ्यासाठी हे माझ मत योग्य वाटत. एखाद्या नात्यात जर तुम्हाला स्वाभिमान महत्वाचा वाटत असेल किंवा वाट पाहून कंटाळा आला असेल तर खुशाल नात तोडून  टाकव  आणि आयुष्यात पुढे जाव. पण जेव्हा माणूस महत्वाचा असतो तेव्हा तुम्हाला समाज, स्वाभिमान बाकी गोष्टी  महत्वाच्या वाटत नाहीत. तुमचं मन तुम्हाला त्या प्रश्नच नक्की उत्तर देईल.   

या जगात माणसाला जीवंत  राहण्यासाठी जस ऑक्सीजन महत्वाचा  आहे  तसच   जगण्यासाठी नात महत्वाच आहे. माणूस  एकटा  जीवंत राहू शकतो पण तो जगतो तेव्हा जेव्हा  तो सुख दुख वाटू लागतो.  आपल्या विवंचना आणि भावना   व्यक्त करण्यासाठी कोणी तरी असतो.   माझ्या मते माणूस कसा ही असो  प्रत्येक नात जपून ठेवाव. कधीच कोणत नात तोडू नये.