आज   instagram'वर   एक  पहिली त्यात एक लहान मूल शिव्या देत होत. आजूबाजूची वयाने फक्त वयाने मोठी असलेली काही मुल त्याची टिंगल करत होती. ते लहान मुल खूप चिडत होत आणि शिव्या देत होत. त्या व्हिडिओवर तशीच थट्टा आणि मस्करी करणाऱ्या कॉमेंट्स होत्या. त्या कॉमेंट्समध्ये काही माणसाचं अस म्हणणं होत की "हेच आई-वडिलांचे संस्कार".


मला ते कुठे तरी नाही पटल. का ते देखील सांगतो. आपण आपल्या शेजारी किती अशी लहान मुलं पाहतो ज्यांचे संगोपन हे योग्य रित्या झालेलं नसतं. त्यामुळे चुकीच्या वयात चुकीची वर्तन आणि संवाद ते आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींशी साधू लागतात. सगळ्यात आधी त्या मुलांचा काही दोष नाही अस मला वाटत. त्यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही की त्यांना या जगात आणा. अशा मुलांचे आई-वडील देखील मुलांचं संगोपन करण्यासाठी सक्षम नसतात आणि दुर्दैव त्या मुलांचं ती जन्म घेतात. आजुबाजूच जग जस वावरत त्याचाच प्रतिबिंब ते स्वतः मध्ये उतरवतात. हे कदाच आपल्या सगळ्यांना चांगलच माहित आहे त्यामुळे त्या विषयाचा खोलवर मी जात नाही.

मला ती कॉमेंट का थोडी योग्य वाटली नाही ते सांगतो. काही परिवांरंची हलाखीची परिस्थिती असते. इतकी की त्या घरात २ वेळच जेवण कस येईल या विचाराने  असे पालक आधीच  त्रस्त  असतात  आणि रोजच्या त्याच प्रयत्नाने आयुष्यात कोणातच बदल होत नाही हे पाहून जेव्हा ती वैतागून घरी येतात, तेव्हा त्यांना पाहिजे असते एक सुखाची आणि काही क्षणांची झोप आणि आराम. त्यात आपल मुल चुकीची गोष्ट करत आहे हे त्यांना दिसत नाही अस वाटण किती साधा गैसमज आहे?

अशा मुलांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल मुल शिव्या देताना किंवा गैरवर्तन करताना दिसत तेव्हा ते नक्कीच त्यांना दमदाटी करत असतील. पण किती काही झालं तरी स्वतःच्या पोटचा गोळा  तो. १२-१५ तास मजुरी करून येऊन देखील नुसत लेकरांवर ओरडण्यात आई-वडिलांना आनंद होत नाही. काही मिनिट ओरडुन झालं की प्रेमाने समजवतातच. अशा माणसांच्या पुढ्यात इतकी डोंगरा एवढी मोठी दुःख असतात त्यांना अशा परिस्थितीच गांभीर्य कळून देखील हतबल होतात. आजच्या रात्री पोटभर घास नीट  घश्या खाली  उतरलेला  देखील  नसतो   आणि  त्याच वेळी "दुसऱ्या दिवशी घरात भाकरी कशी येईल?" या चिंतेत आजची रात्र काढायची वेळ जेव्हा येते तेव्हा या अशा गोष्टी आपोआप छोट्या होतात.

अशा पालकांकडे काय विरंगुळा असतो? आपण बिनधास्त कॉमेंट करतो "हिच आई वडिलांची शिकवण किंवा संस्कार" पण २ वेळच पोटभर जेवून, मूलभूत गरजांच्या पुरेपूर साठा जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा दुसऱ्यांना ज्ञान देणं सोपं जातं. पण अशा पालकांच्या नशिबी काय वाढल आहे कोणाला माहिती? ज्या दुःखची कल्पना करून सामन्या माणसाचा थरकाप उठतो त्या भुकेच्या हैवानाला रोज समोर जाण किती भेसूर आहे हे अनुभव केल्याशिवाय नाही कळणार.

आता मी चूक कोणाची हे सांगत नाही पण जस त्या लहान मुलाच्या शिव्या देण्यावरून त्याचे संस्कार आणि त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीची धिंड कॉमेंट सेक्शनमध्ये काढली तशीच धिंड त्या फक्त वयाने मोठी असलेल्या आणि कॅमेऱ्याच्या मागून त्याची टिंगल उडविणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची का धिंड काढू नये. कॅमेऱ्याच्या आडून ती मुल या अशा गोष्टी करतात हे कितपत योग्य आहे?. अशी किती तरी उदाहरण आपण सगळेच रोजच्या आयुष्यात पाहतो. परिस्थीत वेगळी असते पण असच काहीच मिळत जुळत घडत असत.

आता एक उदाहरण देतो. जे आपण कधी ना कधी अनुभवल असेलच असेल. एक पालकांना २ मुल. दोघांना प्रेम आणि शिस्त सारखीच पण तरी सुद्धा त्यांच्या स्वभावात तफावत ही येतेच. एक मुल शिस्तबद्ध होत किंवा हुशार होत आणि तिथेच दुसर मुल कधी बेशिस्त किंवा कमी हुशार होत. तर घरातल्या घरात आई-वडिलांचं प्रेम कमी पडल का? तर नाही त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण चोख पार पाडली फक्त मुल त्यांच्या क्षमतेप्रमाणे गोष्टी शिकत जातात.

मी कोणाच्या ही विरुद्ध नाही पण मला वाईट वाटत की माणस परिस्थितीचा दोन्ही बाजूने विचार न करता एक बाजू पाहून आपला निर्णय देतात. आई वडिलांना दोष देत जाऊ नका. प्रत्येक पालक आपल मुल एक सुजाण नागरिक आणि योग्य माणूस कसा बनू शकतो यावरच भर देतात आणि प्रत्येक मुल आपल्या क्षमतेप्रमाणे शिकत असतो आणि मोठा होत असतो.
माणसाने निकाल देण्याआधी थोडा वेळ काढून एकदा तरी नाण्याची दुसरी बाजू नक्की पाहावी.