महिना अखेर बँक अकाऊंटमध्ये मोजके पैसे उरतात. नक्की खर्च झाला कुठे याचा पत्ता नाही. अस नक्की का होत?
अशा कोणत्या चुका आपल्या हातून घडतात? किंवा घडत नसतील ही पण पैसा जमाकरण्यासाठी आणि वायफळ खर्च करण्यापासून स्वतःला थांबण्यासाठी काय करू शकतो? हे आपण आता पाहणार आहोत.
कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात असते तो पर्यंत ती अपाय करत नाही. पण एकदा ती मोजमापापेक्षा जास्त किंवा कमी होऊ लागली की त्याचे दुषपरिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
तंत्रज्ञानाने माणसाचं जीवन सुखकर झालं. अवघड आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागल्या. पण कालांतराने त्याचा दुरुपयोग होऊ लागला आणि होत ही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताचे वाढलेले खरेदी विक्रीचे ॲप्लिकेशन.
हे ॲप्लिकेशन छोट्या विक्रेत्यांसाठी, अशिक्षित आणि गरजू लोकांसाठी वरदान तर ठरलेच पण त्याचवेळी सुजाण नसलेल्या ग्राहकांच्या खिश्याला कधी कात्री लागली हे त्यांना कळल देखील नाही. हे अस झालं याच कारण म्हणजे सतत आणि उत्कृष्ट जाहिरात दाखवून आपल्याला जाणीव करून दिली जाते की एखादी वस्तू आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे.
माणसंना आता प्रत्येक गोष्ट महत्वाची आणि आवश्यक वाटू लागली आहे. त्यात भर म्हणजे ऑनलाईन अप्सच एकमेकांत असलेली स्पर्धा. एका दिवसात डिलिव्हरी, काही तासात तर कधी काही मिनिटात डिलिव्हरी, one-time ऑफर अशा सुविधा दिल्यामुळे जो काही संयम माणसात उरला आहे. तो देखील हळू हळू नाहीसा होत चालला आहे. ऑनलाईन शॉपिंग ॲप्स हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे आपल्या खिशाला कधी कातर लागते कळत नाही आणि महिना अखेर आपल्यालाकडे पैसा उरत नाही. आता तोच थोडा थोडा करून जाणारा पैसा कसा वाचवायचा तो समजून घेऊ या.
आता यावर उपाय काय? आणि त्याचे फायदे काय? हे जाणून घेऊया.
१) ऑडिट
उपाय आणि फायदा हे तुम्हाला एकच साधी आणि सरळ गोष्ट केल्याने सापडतील. ती म्हणजे तुमचं बँक स्टेटमेंटच तुम्ही केलेल ऑडिट. त्यात एवढच बघा की किती विनाकारण तुम्ही गोष्टी ऑनलाईन खरेदी केल्या आहेत आणि त्याची एक याधी करा.
जस खाण्यावर, शॉपिंगवर किंवा दुसरी कोणती एखादी गोष्ट आणि त्याच गोष्टींची किंमत एकदा बाजारातील दुकानात विचारा. तुम्हाला सहज कळेल की हे ऑनलाईन खरेदी किती महागात पडते.
२) प्रामाणिक प्रश्न उत्तर
कोणतीही गोष्ट खरेदी करते वेळी काही प्रश्न स्वतःला विचारा
१) आपल्याला खरच या वस्तूची किंवा गोष्टीची गरज आहे का?
२) खरेदी करणाऱ्या वस्तूचा बाजारभाव आपण मोजत असलेल्या किमतीपेक्षा कमी आहे का?
३) खरेदी करणाऱ्या वस्तूची काही पर्यायी स्वस्त आणि टिकाऊ वस्तू आहे का?
असे काही प्रश्न विचारा, त्यांची प्रामाणिक उत्तर स्वतःला द्या. अस केल्याने तुम्ही बरेच वायफळ खर्च करण्यापासून स्वतःला वाचवू शकता.
३) अनइंस्टॉल शॉपिंग ॲप्स
आपण खूप सारे शॉपिंग ॲप्स इंस्टॉल करून ठेवतो पण त्यांना कधी उघडुन देखील बघत नाही. अचानक कधी तरी लिमिटेड ऑफर नावाची notification येते आणि आपले पैसे घेऊन जाते.
पैसे नसले तर आपण त्या वस्तूला bucket list मध्ये टाकून ठेवतो आणि पैसा आला रे आला की खर्च करतो. म्हणून शॉपिंग ॲप्स अनइंस्टॉल करा.
जिकडे तिकडे WiFi आणि दिवसाला १ GB data तर आहेच. कधी गरज लागली तर तुम्ही अप्स डाऊनलोड करून पाहिजे ते ऑर्डर करू शकता.
४) फक्त कॅश पेमेंट
जस मी सुरुवातीला म्हंटल की कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली की त्रासदायक ठरतेच. फास्ट आणि डिजिटल होण्याच्या नादात आपण आपल्या खर्चावरचा ताबा गमावून बसलो.
आता डिजिटल पेमेंट कधी कधी खूप सोईस्कर पडतात म्हणून त्यांच्यावर आळा बसवता येणार नाही. पण त्यांच्या वर ताबा ठेवायचा असेल तर एक उपाय आहे. कॅश पेमेंट करा. कॅश पेमेंटचे फायदे म्हणजे तुमचा तुमच्या खर्चावर लक्ष राहत.
हातातून पैसे जाताना दिसतात तेव्हा थोड काळजाला चर्र होत आणि आपण पुढे खर्च करते वेळी थोड जपून करतो.
५) पैसे गुंतवणूक
लहानपणी आपल्याला खाऊला मिळणारा पैसा आपण आई-बाबांना द्यायचो आणि गरज असायची तेव्हा मागायचो. तसच काही आता करून पाहा.
पगार किंवा तुमच्या हाती पैसा आला की पाहिले त्यातला ४०% भाग योग्य जागी गुंतवून ठेवा. अशामुळे दोन गोष्टी होतील तुमचा पैसा देखील जमा होईल आणि वायफळ खर्च करायचं जरी ठरवलं तरी देखील मोजकाच पैसा हाती उरेल.
सारांश
डिजिटल पेमेंटमुळे लोकांना रिकाम पाकीट बघण्याची सवय राहिली नाही. रिकाम पाकीट माणसाचे डोळे उघडतात. वायफळ खर्च यावर बंदी आणण्यासाठी आणि पैसा बचत करण्यासाठी हे उपाय नक्कीच परिणाम कारक आहेत आणि हे माझं मत नाही हा माझा अनुभव आहे. तुम्हाला देखील आपले पैसे वाचवायचे असतील तर हे उपाय नक्कीच करून पाहा. तुमच्याकडे देखील काही उपाय असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून लोकांची मदत करा.
0 Comments