चला मित्रांनो नेहमीच्या विषयावर  वेगळस बोलू काही.  आपल्या आयुष्यात खूप अशा गोष्टी महत्वाच्या  असतात पण एक गोष्ट जी प्रत्येकाला आयुष्यात पाहिजे असते आणि  त्या एक गोष्टीसाठी तो आयुष्यभर  नको नको त्या जागी शोध घेत असतो.  ती  गोष्ट म्हणजे  "आनंद".

खूप वेळा आपण पहिलं असेल की आपण इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल करत असतो, आणि अचानक  आपल्या डोळ्यासमोर एक quote येत "आनंद हे ध्येय नसून प्रवास आहे."  ऐकायला छान शब्द वाटतात बरोबर?, पण त्याचा नेमका अर्थ काय? आनंद राहण  ही मायावी गोष्ट आहे जी आपण सर्वजण पकडण्याचा प्रयत्न करीत आहोत कि आपल्या सोबत फिरत असलेल्या मित्रांसारखा आहे?

चला थोड  आणखीन स्पष्ट जाणून  घेऊया. कल्पना करा की तुम्ही तुमचं  ध्येय  सध्या करण्यासाठी  प्लान करत आहात. तुमचे ध्येय आहे की स्वप्नातली नोकरी मिळवणे किंवा चपाती  न भजता  बनवण्यात  प्रभुत्व मिळवणे. पण इथे खरी मजा आहे: खर  तर ते ध्येय  सध्या करण्यापेक्षा त्या प्रवासाला आनंदाने सामोरे जाणे हेच खरे महत्वाचे  आहे.

आयुष्य अनेक  साहसी  वळणांनी भरलेल आहे, आणि का अंदाज लावावा? सुखाचा शोधही तसाच आहे. हे काही अस नाही की काही  दिवस पथ्य  पाळले आणि सगळ आयुष्य हे आनंदवन झाल. नाही अस अजिबात नाही, आनंद म्हणजे तुमच्या प्लेलिस्टमध्ये shuffle होऊन येणारी गाणी; गाण कोणत ही असो त्याच्यातला आनंद  देणाऱ्या चांगल्या गोष्टी शोधायच्या.

आणखी  स्पष्ट  उदाहरण द्यायच  झाल तर  तुम्ही स्वप्नांत  पाहिलेली नोकरी मिळाली. छान झाल, बरोबर? पण आनंद नोकरीच्या पदाच  नाव आपल्या नावांसोबत  लागण्यात नाही;  खर  तर  हा  लहान विजयांमध्ये आहे, तुम्ही ज्या आव्हानांवर मात करता आणि या प्रवासात  तुम्ही जी  माणस  जोडता.

आता, मी असे म्हणत नाही की ध्येय निरुपयोगी आहेत. ध्येय ही तुमच्या प्रवासातील क्षणभर विश्रांतीच्या जागा  असतात. ते तुम्हाला दिशा देतात. पण  कधी  कधी  तुम्ही पुढील चेकपॉईंटवर किंवा ध्येयावर  पोहोचण्यावर इतके लक्ष केंद्रित करता  की तुम्ही प्रवासाचा किंवा  क्षणोक्षणी येणाऱ्या   आनंदाचा अनुभव  घेण्याच  विसरून जाता, आणि अस जर होत आहे तर तर तुम्ही सर्वोत्तम भाग गमावू शकता.

आपल्या प्रत्येकाची स्वप्ने आहेत. पण जर ती स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात मिळणारा आनंद जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर आपण आपल धेय्य साध्या करून देखील त्या क्षणात किंवा त्या यशाचा आनंद आपल्याला लुटता येणार नाही आणि मन समाधानी नसेल तो त्रास वेगळा.

उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला इंजिनियर होण्याची इच्छा नाही तरी देखील तुम्ही कसे बसे इंजिनियर झालात तरी काय अर्थ राहतो. ना तुम्ही तुमच्या अभ्यासाला किंवा शिक्षणाल नीट समजून घेतलं आणि ते शिक्षण एक काम म्हणून ती गोष्ट पार पडलीत. इंजिनियर होऊन देखील तुम्ही ती पदवी मिळवण्याचं यश त्यात असलेला आनंद अनभवू शकणार नाही. कारण तुम्ही फक्त धेय्य साध्या करण्यावर लक्ष दिलं पण तिथं पर्यंत पोहचण्यासाठी होणाऱ्या प्रवासाला जगाला नाहीत.

तर आतापासून पुढे आपण रोज नवीन काय शिकलो हे पाहा किंवा काय शिकू शकतो हे ठरवा. रोज मिळालेल्या प्रत्येक छोट्या छोट्या यशाला साजर करा.

फक्त धेय्याचा पाठलाग करू नका. चला प्रवासाचा आस्वाद घेऊ, एका वेळी एक आनंदी पाऊल. तुमचं या ब्लॉगवर काय विचार आहे ते कमेंट करून नक्की कळवा🚗💨