तीने बरेच मुलगे पाहिले जे दिसायला देखणे होते, परंतु सामान्य आणि कंटाळवाणे देखील. तीने त्यापैकी बहुतेकांवर डावीकडे स्वाइप केले, जोपर्यंत तो तीच्या नजरेला भिडला नाही. त्याचे स्मितहास्य, फॉर्मल हेयर स्टाइल आणि त्याला चष्मा होता. तो चित्रकार होता. त्याच्या बायोमध्ये लिहिले होते की त्याला पुस्तके आणि प्रवास आवडतो. तीच्या मनाने कौल दिला आणि याच्याशी आपली मैत्री व्हावी अस तीला वाटत होत. तीने उजवीकडे स्वाइप केली.
तीला मॅच झाल्याची notification आली. त्याला देखील ती आवडली. तीने चॅट ओपन करून मेसेज टाईप केला.
ती : "hi"
तीला टेंशन तर आलच होत पण ती उत्साही देखील होती. त्याच्या रीप्लायची ती आतुरतेने वाट पाहत होती.
तो : "hi"
त्याने काही सेकंदांनी उत्तर दिले. तीने स्वतःह संभाषण पुढे चालू ठेवायचे ठरवले.
ती msg करणार त्या आधीच तीला msg आला.

तो : "मी या app'वर फक्त मैत्री करण्यासाठी आलो आहे. मी introvert आहे त्यामुळे आपण एकमेकांबद्दल personal काही न विचारता दुसर काही तरी बोलू. बघू हे conversation कुठे जात. योग्य वेळ आली तर मन कौल देईलच सगळ काही सांगण्यासाठी"
ती थक्क झाली जणू काही तीच्या मनातल कोणी तरी न सांगताच बोलून दाखवत होत. तीच मन आणखी आनंदी आणि बिनधास्त झाल.
ती : "तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तक आवडतात"
तो : "मला बहुतेक काल्पनिक कथा आवडतात, विशेषत: साय-फाय आणि कल्पनारम्य आणि तुम्हाला?"
ती : "मलाही काल्पनिक कथा आवडतात, पण मला रोमॅंटिक आणि रहस्यकथा आवडतात. तुमचं आवडतं पुस्तक आहे का?"
तो : "हे सांगणे कठिण आहे, बरेच चांगले आहेत. परंतु मला वाटते की जर मला एक निवडायचे असेल तर "चंद्रविलास लेखक नारायण धारप" यांच असेल. मला आवडलेल्या भय कादंबरीतील ही एक कादंबरी आहे. तुमची कोणती आवडती कादंबरी आहे?"
ती : "मला ही पुस्तक खूप आवडतात! माझे आवडते पुस्तक "बुमरॅंग लेखक बाबा कदम" यांच आहे. ही एक क्लासिक रोमॅंटिक कादंबरी आहे."
त्यांच्यात बरेच साम्य आहे हे शोधून त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. दोघांनाही पुस्तक, चित्रपट आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्यात मजा आली. बऱ्यापैकी सुर जुळतात हे पाहून दोघांनीही फोन नंबरची देवाणघेवाण करण्याचे आणि दुसर्या app'वर त्यांचे संभाषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. ते दररोज एकमेकांना मजकूर पाठवत, विनोद, कथा आणि त्यावरील मते मांडत. त्यांना दुर्मिळ आणि विशेष असे कनेक्शन त्यांच्यात वाटू लागले.

ती : तुम्हाला अस वाटत का की आपण आता भेटायला हव? मला तर इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची.
तो : पण माझी इच्छा नाही. मला भीती आहे की ही भेट शेवटची राहील. कारण खूप वेळा अस झाल आहे की मला भेटल्यावर माझी मैत्री नकोशी वाटू लागते.
ती : अस का? काही तरी कारण असेलच.
तो : मी तुझ्यापासून काही तरी लपवल आहे आणि तेच कारण आहे माझ्यापासून जग तोंड फिरवत.
ती : अस असेल तर मी सुद्धा काही लपवल आहे. आणि मला त्याचा उलघडा भेटून करायचा आहे. खूप नकार मी देखील मिळवले आहेत. आता तर नक्कीच भेटायला हव.
तो : चालेल एवढे नकार त्यात आणखी एक वाढला तरी काही हरकत नाही.
त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळील एक आरामदायक कॅफे त्यांच्या भेटीचे ठिकाण म्हणून निवडले.
ती प्रथम आली आणि खिडकीजवळच्या टेबलावर बसली. तीने तीचा फोन तपासला आणि पाहिले की त्याने तीला मजकूर पाठवला होता की तो लवकरच पोहचणार आहे. वास्तविक जीवनात तो कसा दिसेल असा विचार करत ती कॅफेभोवती पाहिले.
तीने त्याला दारातून आत येताना पाहिले. तो हुबेहूब त्याच्या प्रोफाईल पिक्चरसारखा दिसत होता. एकमेकाना पाहता ते एकमेकांच्या प्रेमात पडले हे काही सांगण्याची गरज नव्हती. तो त्या प्रोफाइल पिक्चरपेक्षा अधिक देखणा आणि मोहक होता. तो देखील विचार करत होता की या मुलीला नकार कोण देऊ शकत? इतकी सुंदर मुलगी आणि अजून हीला कोणी जोडीदार मिळाला नाही म्हणजे नवलच.
दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. तो तीच्यासमोर बसला आणि एक शांतता दोघांमध्ये होती पण ती बोचरी नव्हती. दोघेही कोणतीही शरम न बलागळता एकमेकाना मनसोक्त बघत होते.
ती : खूप सुंदर दिसता तुम्ही (नकळत तीच्या तोंडून बाहेर पडल आणि नंतर कळल की अस बोलण योग्य नव्हत)
ती थोडी uncomfortable झाली. त्याने फक्त स्माइल दिली.
तेवढयात वेटर येऊन तीच्या मागे थांबला आणि काय घेणार हे विचारत होता. पण ती वेटरला न पाहता त्याच्याकडेच पाहत होती. जणू काही भुरळ पडली होती तीला. त्याने खुणावल वेटर आहे मागे. तेव्हा तीच लक्ष गेल. तीने स्वतसाठी एक चहा आणि त्याला विचारल “तू काय घेणार” तो काहीच बोलला नाही. तीच्याकडे बघून हसला आणि बाहेर बघू लागला. तीने २ चहा सांगून वेटरला पळवल.
ती आता थोडी घाबरली आणि गोंधळली. खूप प्रश्न तीच्या मनात येऊ लागले. “नक्की हाच का तो? की मी कोणा चुकीच्या माणसाला ओळख दाखवली?” तीने फोटो पुनःह पहिला तर समोर बसलेला तोच होता. तीची ही तगमग त्याला कळली. ती फोटो पाहत होती तेवढ्यात तीच्या मोबाइल वर त्याचा msg आला, “मला बोलत येत नाही, मी जन्मापासून मुका आहे”.
तीला धक्काच बसला. इतका सुंदर दिसणार व्यक्ति आणि नियतीने का अस कराव. तीला मानवर करून त्याच्याकडे बघण्याचा धीर होईना. तीने त्याला पहिलं आणि तीच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद तर होताच पण दुख देखील होत. त्याने तीच्या डोळ्यात पहिलं आणि काहीच कळेना. काही सेकंद वाट पहिली आणि मग तो निरोप घेण्यासाठी उठतच होता तेवढ्यात तीने त्याला थांब म्हणून खुणावल. तो पुनःह बसला. त्याला बोलण्यात रस राहील नव्हता. त्याला तीच्याकडे पाहता देखील येत नव्हत. तो स्वताला गुन्हेगार समजत होता.
ती हसू रोखण्याचा प्रयत्न करत होती पण हसू काही थांबेना. त्याला अस वाटल की ती आपल्यावर हसत आहे. तो थोडा वैतागला आणि हे तीला कळल. ती sign language’मध्ये बोलली “मला ऐकू येत नाही” अस बोलून ती हसू लागली. त्याला ही हसू येऊ लागल तो तोंडवर हाथ ठेवून हसू लागला. दोघे ही मनसोक्त हसले. वेटर चहा घेऊन आला.

दोघांचं sign language'मध्ये बोलणं सुरु झालं.
तो : खूप दिवसांनंतर मी एवढा हसलो.
ती : मी देखील. खर तर मी एवढी बोलकी नाही.
तो : आपल्या या भाषेची गम्मत सांगू?
ती : हो
तो : आपण आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला शिव्या देखील बिनधास्त देऊ शकतो.
ती : आणि लोक आपल्याला वेड्या सारखे बघतात आणि आपण त्यांना वेड्यात काढत राहतो.
कॅफेमध्ये बसलेली माणस चोर नजरेने त्यांच्या होणाऱ्या खाणाखुणा बघत होते.
कॅफे'मध्ये त्यांनी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्ति वर बिनधास्त comment करत होते आणि हसत होते. सूर्यास्त देखील होऊन गेला होता.
ती : चला निघू या. इच्छा नाही पण पण मनावर ताबा ठेवायला पाहिजे.
तो : हो
दोघेही कॅफेच्या बाहेर आले
तो : चला भेटू पुनःह
ती : म्हणजे तुम्ही मला घरापर्यन्त सोडायला येणार नाही?
तो : नाही. जस तुम्हीच म्हणालात इच्छा आहे पण मनावर ताबा ठेवायला पाहिजे.
ती : आजची भेट आवडली का? आणि भेटण्याचा निर्णय योग्य होता ना?
तो : हो. मला नेहमी वाटायचं की मी अपूर्ण आहे पण मला अपूर्ण ठेवण्याचं कारण आज मला कळलं. मी खूप पुढच बोलतो आहे. राग आला तर sorry पण मला वाटत आपण दोघे अपूर्ण एकमेकांना पूर्ण करू शकतो आणि या नात्याला मला खूप पुढे अगदी आयुष्यभर जपण्याची इच्छा आहे.
ती : तुमचं मी मन दुखवू इच्छित नाही पण मला वाटत पहिल्या भेटीत हा निर्णय खूप घाईचा राहील.
त्याचा चेहरा थोडा उतरला. हे तीला लगेच कळलं.. खरतर त्याच्यासारखे विचार तीच्या मनात ही होते पण तीला कोणतही निर्णय घाईत घेण्याची इच्छा नव्हती.
ती : मला फक्त एवढच वाटत आपण दोघे अपूर्ण आहोत आणि एकमेकांना आपण पूर्ण करू शकतो. हे नात आयुष्यभर जपू आणि जगू शकतो. पण या अपूर्ण भागांना जोडण्याचं त्याला परिपूर्ण आणि अतूट बनविण्याच काम आपल्यातल हे नात करणार आहे. तर हे नात पारदर्शक आणि विश्वासाच्या अशा पायावर उभ राहावं की काही नशिबी आलेल कोणत ही वादळ आपल्याला वेगळ करू शकणार नाही.
तो निशब्द झाला, पण तीच्या उत्तराने तो समाधानी होता. त्याने निरोप घेण्यासाठी हाथ पुढे केला. तीने हाथ न मिळवता त्याला मिठी मारली. आणि त्याच्या कानात हळू आवाजात बोलली
ती : काळजी करू नका. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
0 Comments