आपल्या प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा आहे पण यशस्वी होणे म्हणजे काय? याचा विचार आपण नीट कधी केला नाही. प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगळी असते. कोणासाठी यश म्हणजे प्रसिद्धि किंवा प्रशंसा तर कोणासाठी यश म्हणजे अफाट श्रीमंती. अशा अनेक व्याख्या आपण आपल्या मित्र मैत्रिणी किंवा आई वडिलांकडून देखील ऐकल्या असतील. आता ही यशस्वी होण्याची आपण स्वप्न पाहतो पण प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न केला तरी देखील अपयश पदरी पडल की प्रयत्न बंद करतो. पण खरंच हे कितपत योग्य वाटत?
आपल्या सगळ्याना काही गोष्टी माहीत आहेत पण वेळोवेळी आपण त्या विसरतो. त्यातील काही गोष्टी किंवा कटू सत्य म्हंटल तर चुकीच ठरणार नाही
1) एक दिवसात स्वप्न पूर्ण होत नाहीत.
2) यश मिळवण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही. मेहनत हा एकच उपाय
3) यश देखील त्यानाच मिळत जे अपयशी होऊन देखील पुनःह प्रयत्न करतात.
असे किती तरी प्रेरणादाई वाक्य आपण रोज ऐकतो पण फक्त लाइक, कमेन्ट किंवा शेअर करून विसरून जातो.
तर आता आपल्या यशाची व्याख्या काय आणि ती कशी ठरवावी? हे मी तुम्हाला उदाहरणा सहित सांगणार आहे. जेणे करून तुम्हाला तुमची यशाची व्याख्या शोधण्यास मदत होईल. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्यासाठी यश म्हणजे काय? या प्रश्नाच उत्तर एका पानावर लिहून काढा. उत्तर कितीही मनात येऊ देत पण ते लिहा. त्या नंतर तुम्हाला ते यश मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते लिहून काढा. त्या नंतर त्यासाठी दिवस, महिना आणि वर्षाच एक वेळापत्रक बनवा.
आता याच उदहारण आपण पाहूया,मला एक लेखक म्हणून प्रसिद्धी मिळवायची आहे आणि ही माझी यशाची व्याख्या आहे. आता लेखक पण कोणत्या प्रकारच लेखन करायच आहे ते माहिती करण्यासाठी मी मला आवडत्या प्रत्येक प्रकारच लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ कविता, लेख आणि कथा इत्यादि. आता वेळापत्रक -
अ) दिवसच वेळापत्राक - दिवसाचे २ तास वाचनाला आणि १ तास लिखाणाला देणार आहे.
ब) आठवड्याचे वेळापत्रक - आठवढ्याचा शनिवार किंवा रविवार हे त्या आठवडयात जे काही लिहिल त्यावर लेख, कविता किंवा कथा लिहिण्यासाठी.
क) वर्षाचे वेळापत्रक - कमीत कमी वर्षाला लेख, कविता आणि कथा या तिन्ही गोष्टी मिळून ५२ झाल्या पाहिजेत म्हणजे जर आपण पहिल तर आठवड्याला एक गोष्ट नियमितपणे केली तर हे एक ध्येय यशस्वी होऊ शकत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्ण वर्ष एवढ करून यशस्वी कसे होणार? आणि पूर्ण वर्ष एवढच करून त्याचा फायदा काय? तर वरचच उदाहरण घेऊ जर मी स्वताला लेखक म्हणवू इच्छितो तर माझ्या स्वतचे काही लेख पाहिजेत, एका शब्दात म्हणायच तर Portfolio. आता हा portfolio तयार झाला की मी पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचा वापर माझ लेखक म्हणून अस्तित्व घडवण्यासाठी करू शकतो.
आशा आहे हा लेख तुम्हाला देखील तुमची यशाची व्याख्या शोधून देण्यास यशस्वी ठरेल. काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या मी लेखाच्या सुरुवातीला सांगितल्या आहेत. यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आणि सयम तुम्ही आंगीकरला पाहिजे. हा लिहिलेला लेख आवडला असल्यास नक्की कमेन्ट करून सांगा.
0 Comments