संध्याकाळचे ६ वाजले
होते. तो ऑफिस मधून निघाला आणि रिमझिम पावसाची सुरुवात झाली. आज एक तर वाढदिवासला
जायच होत आणि त्यात हा पाऊस. तस तर पावसाळा त्याचा आवडता ऋतु पण आता तो तेवढा
आवडता राहीला नव्हता. मन जेवढ आनंदी होत तेवढच हिरमुसलेल देखील. दुष्काळात तेरावा
महिना म्हणजे तो एअरफोनस देखील विसरला होता. त्यामुळे मनात चालणाऱ्या विचारांना
त्याला लगाम घालत येईना. खरंतर पावसाच्या त्या सरींमद्धे त्याच मन कल्पनांची भरारी
घेत होत आणि पुनःह त्याच जगात घेऊन जात होत ज्याचा रस्ता खूप वर्षा आधी तो मुद्दाम
विसरला होता. स्टेशनला पोहचला आणि पावसाने चांगलाच जोर धरला.
तो प्लॅटफॉर्मचा दादर
उतरत होता पण त्याच्यापुढे १ वयस्कर जोडप चालत होत. तो थोडी जागा भेटते का ते पाहत
होता. प्लॅटफॉर्मला लागलेली ट्रेन त्याला पकडायची होती. पण ते काही शक्य झाल नाही.
ट्रेन चालू झाली आणि तिघे शेवटची पायरी उतरले. तेव्हा त्या आजी आजोबाना म्हणाल्या
“जाऊ दे नाशिबातच नव्हती”. आजोबा देखील हसत म्हणाले “तू आहेस ना शेजारी आणि काय
हाव? येईल दुसरी ट्रेन त्याने
जाऊ” त्या दोघांच्या चेहऱ्यावर असलेल समाधान त्याला सुखावून गेल. पण ते जास्त काळ
टिकल नाही. इंडिकेटर पहिल तर चर्चगेट एसी ट्रेन लागली होती. “आज उशीर होणार” हाच
विचार करत तो नेहमीच्या जागी येऊन उभा राहीला आणि एक टक आभाळतून कोसळणाऱ्या
सरींकडे पाहू लागला.
दुसरीकडे भल मोठ ऑफिस आणि
त्यात कमीत कमी ५० ते ६० एम्प्लॉयी. घोड्यांच्या डोळ्याला जस फ्लाय मास्क लावतात
तसच प्रत्येकाला एक छोट तीन्ही बाजूने झाकलेल डेस्क दिल होत. त्या गर्दीत एक
डेस्कवर ती होती. मुसळधार पाऊस चालू झाला. आधी कामत गुंग असलेली ती, काचेवर कोसळणाऱ्या सरींच्या आवाजाने तीची
एकाग्रता भंग झाली. वर डोळे करून पहिल तर लांबलचक ऑफिसच्या त्या खिडकीवर सरी कोसळत
होत्या. बाहेर पावसात न जाता देखील तीच्या मनाला तो गार वारा जाणवू लागला. पहिल्या
पावसात येणारा मातीचा सुगंध तीला अनुभवायचा होता. आज तीला वाटल काम लवकर संपवून
आपण थोड निवांत घरी जाऊ. या पहिल्या पावसाला तीला मनसोक्त जगायच होत.
चोरकप्यात एवढ वर्ष लपवून
ठेवलेल्या त्या भावनांना दरवर्षीप्रमाणे पहिल्या पावसात न चुकता पुन्हा
अनुभवायच्या होत्या. हा विचार चालू असतानाच तीच्या डेस्कवर जोरदार काही तरी
आदळल्यासारख वाटल. पहिल तर बॉस नवीन काम घेऊन आला होता आणि दुसर म्हणजे
नेहमीप्रमाणे त्याच ते काम महत्वाच होत. तेव्हाच तीला कळल आज काही लवकर सुटका
नाही. नेहमीची वेळ येणार आणि या पहिल्या पावसाला धावती भेट द्यावी लागणार. तो दादरला पोहचला.
चालत्या ट्रेन मधून उतरला आणि त्याने जीने चढण्यासाठी धाव घेतली. दादर स्टेशनला
पुनःह गर्दी आणि त्याच मूड ऑफ करण्यासाठी एवढ पुरेस होत. शेवटी कसाबसा तो गर्दीतून
निघाला. प्लाझा थिएटरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या फूटपाथला बसची वाट पाहू लागला.
काही वेळेनंतर बस आली आणि
तो अगदी नेहमी सारखा वेळेवर सगळ्यांच्या आधी पोहचला. ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता
ती तब्बल २-३ वर्षानंतर भेटत होती मनसोक्त गप्पा झाल्या, नंतर वाढदिवस साजरा झाला आणि मग पाहुणचार. पावसाच्या हलक्या
हलक्या सरी अधून मधून कोसळत होत्या. तसच बर्थडे गर्लचा निरोप घेऊन जो तो आपल्या
वाटेल निघाला. पावसाचा जोर काही केल्या कमी होईना, त्यामुळे उगाच त्याची लपत छपत जाण्याची इच्छा अजिबात
नव्हती. तो जांबोरी मैदानाच्या बस स्टॉप जवळ जाऊन थांबला. पाऊस थोडा आता शांत झाला
होता. जणू काही वर्षभर जे उराशी कवटाळून ठेवले होत त्याला पाझर फुटली होती आणि आता
कुठे त्याच मन शांत झाल असाव.
दुसरीकडे ती नुकतीच ऑफिस
मधून निघाली. पण तीच मन इतक आनंदी खूप वेळेनंतर होत. जणू काही पावसाच्या सरी
तीच्या हृदयावर बरसल्या होत्या आणि काळाच्या ओघात जे खोलवर दडपल गेल होत त्यांना
आता नवीन अंकुर फुटत होत. ऑफिस मधून निघण्यासाठी उशीर झाला आणि हे काही तीच्यासाठी
नवीन नव्हत. पण पहिला पाऊस तीला मनासारखा जगता आला नाही याची खंत तीला लसत होती.
छत्रीच्या टोकांवरून ओघळणारे थेंब पाहत. रसत्यात साचलेल्या पाण्यात वाकडे तिकडे
पाऊल टाकत आणि आपल्याच धुंददित ती बस स्टॉपला पोहचली. बस स्टॉपला पोहचताच बस देखील
आली. तो ताटकळत बस स्टॉपला बसची वाट पाहत होता पण त्याला कुठे माहीत होत की
दुसऱ्या बाजूने त्याचा भूतकाळ पलीकडच्या बस स्टॉपला उतरणार होता. ती बस मधून उतरली
आणि ती बस निघून जाता दोघांची नजर एक झाली.
उर्वरित पुढच्या भागात..
0 Comments