५ वाजले होते. तो दार उघडून घरी आला. सोनचाफ्याचा घमघमाट पूर्ण घरभर झाला. त्याची नजर तीला शोधू लागली.
तो :- अग ऐकलस का? कुठे आहेस? बघ मी तुझ्यासाठी काय आणल आहे?
ती :- हा काही प्रश्न
झाला का विचारायचा? तुम्ही जे आणल आहे त्याचा सुगंध पूर्ण घरभर
पसरला आहे.
तो :- अग खोट का असेना पण
सरप्राइज हो.
तीने आणखी चिडवण्याची
सुरुवात केली. जरा जास्तच खोटे भाव चेहऱ्यावर आणू बोलू लागली.
ती :- अरे बापरे काय
गम्मत घेऊन आलात? दाखवा नाही तर हा सस्पेन्स जीव घेईल माझा.
त्याने तीची ही नाटक
ओळखली पण तीचे शेवटचे शब्द त्याला लागले.
हातात एवढी बहरलेली आणि
सुगंधी फूल असून देखील चेहरा मात्र कोमेजून गेला होता. तो काहीही ना बोलता फूल
टवटवीत राहावी म्हणून त्यावर स्वयंपाक घरात जाऊन पाणी शिंपडू लागला. ती फूल
स्वयंपाक घरात तशीच ठेवून तो बाहेर सोफ्यावर येऊन बसला आणि मावळतीकडे झुकणारा
सूर्य शांत नजरेने पाहू लागला. तीला हे कळल की आपण केलेली मस्करी थोडी जास्तच
झाली. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली.
ती :- अरे मस्करी केली
रे. एवढा का चिडतोस आणि नकळत तोंडून निघाल.
तो :- जाऊ दे काही हरकत
नाही. बोल.
ती :- हे तुझ बर आहे.
तुझा राग घालवण्यासाठी जास्त काही कारव लागत नाही. प्रामाणिकपणे थोड बोल की बस.
ती त्याला बिलगली आणि
दोघे ही तो सूर्य पाहू लागले.
तो :- कस असत ना ग? आता मी चिडलो होतो तर मला फक्त त्या सूर्याची आग आणि तळपणारी किरण दिसत होती.
आता तू मला बिलगलिस तर त्या शेजारी क्षितिजावर पसरलेले रंग आणि तो सूर्य दोन्ही ही
शांत वाटू लागले. तुझ्यात काही तरी जादू नक्की आहे. तुझाविन आणि तुझ्यासोबत माझ
आजूबाजूच परिसर नेहमीसारख असून देखील सगळ बदलून जात.
ती :- काही ही काय रे?
तो :- तुझ शेजारी असण, तुझा आवाज, तुझा सहवास या गोष्टींना किती महत्व आहे हे मी
तुला नाही सांगू शकणार. पण एवढंच सांगतो जेवढा महत्वाचा श्वास तेवढीच तू. तो
मस्करीच्या मूड मध्ये नव्हता पण तीच मस्करी करण्यापासून काही मन भरल नव्हत. ती
पुनःह त्याला चिडवू लागली.
ती :- किती फीमली रे? मी ऐकते म्हणून काही ऐकवशील का रे?
अस म्हणून ती हसू लागली.
त्याला पण हसू आल पण तो गोंधळला देखील होता की नक्की ही का अशी?
ती :- मस्करी केली रे.
नको मनावर घेऊ. तुझी सोबत कधीच कंटाळवाणी नसते. उलट तुझ हे बोलण ऐकण्यासाठी कधी
कधी मन आतुर होत.
खिडकीकडे पाहत तो गंभीर
झाला. तीने ते ओळखल.
ती :- काय झाल?
तो :- काही नाही.
संध्याकाळ नेहमी मला नकोशी वाटू लागते. हळू हळू जणू माझ शरीर गोठू लागत.
वातावरण पुनःह हसर
करण्यासाठी तीने कॉलेज मधली एक आठवण शोधून काढावी अस ठरवलं.
ती :- तुझी कॉलेजची
सगळ्यात आवडती आठवण सांग ना.
तो :- तुला आवठवत आपल
एकमेकांवर प्रेम आहे हे कॉलेजमध्ये बहुतेक प्रोफेसरना माहीत होत.
ती :- अरे ते अकाऊंटस
शिकवणारे सर त्यांनी तर मला विचारल देखील होत. “काय ग आज बस स्टॉपला थांबला नाहीत?”
दोघे ही स्वतच्या मूर्खपणावर
खूप हसत होते. सूर्य मावळत आला होता. अंधार पसरत होता.
ती :- संध्याकाळी
तुझ्यासोबत शांत समुद्राला पाहण पण कधी कधी खूप आठवत. बोलण काही नाही फक्त शांत
समुद्र, तू आणि मी.
ती आपल्यातली शांतता मला
बोचरी कधीच वाटली नाही. उलट त्याचा हेवा मला आज ही वाटतो आणि ते क्षण देखील आज ही
पुनःह जगावेसे वाटतात. तुला हे आठवतात का रे? हे क्षण तुला त्रास देतात?
तो :- हे क्षण मी विसरू
शकतो हे तुला कस वाटू शकत? मी काहीच विसरू शकत नाही ना तुला आणि ना
तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक क्षणाला.
ती :- पण एक गोष्ट तू आता
विसारतो आहेस. ६:३० वाजत आले अजूनही माझ्या फोटो पुढे तू सोनचाफा ठेवला नाहीस. तो
चंदनाच्या हाराचा वास सहन होत नाही रे दिवस भर. मी किती वाट पाहत असते त्या
फुलांची आणि त्या सुगंधाची. ती हसत होती पण त्याच्या डोळ्यात मात्र लगेच पाणी आल.
त्याला काय बोलायच काहीच सुचेना. तो फक्त मावळणरया सूर्याकडे पाहून आणि उरातले
हुंदके दाबून रडत होता.
तो :- मी नाही विसरत. पण
ते फूल ठेवल्यावर मला कळत की तू फक्त भास आहेस सत्य नाही. एवढा मोठा अखंड प्रवास
मला एकट्याला करायचा आहे हा विचार करून अंगावर काटा येतो. येणारी प्रत्येक
संध्याकाळ माझा जीव घेते आणि सकाळ तुझे भास मला पुनःह जीवन देतात.
ती :- जे नियतीने केल ते
योग्य अयोग्य माहीत नाही पण तू जगाव आणि मनसोक्त जगाव ही एकमेव माझी इच्छा होती.
नियतीने आपला प्रवास इथवरच लिहिला होता. पण मी तुझ्यासोबत नेहमी आहे. अगदी या सोन
चाफ्याच्या सुगंधासारखी कदाच मी दिसणार नाही पण माझा सहवास तुला नेहमी जाणवत
राहील.
0 Comments