भाग – २

दोघांची नजर एक होताच. जणू काही ढगात कडाडणारी वीज त्यांच्या काळजात उतरली आणि काळ्याभोर डोळ्यात सरी बरसू लागल्या. तीने फक्त एकदाच गाडी येत का हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहिलं आणि त्याच्याकडे धावत सुटली. पण त्याच्या जवळ पोहचताच ती भानावर आली. काही इंचावर असलेला तो आता तीला खूप दूर वाटू लागला. जणू काही क्षणात त्यांच्या दोघांमध्ये त्यांना सोडून कोणाला ही न दिसणारी दरी निर्माण झाली. तो एक पुतळ्यासारखा तीला पाहत उभा राहीला.

ती – कसा आहेस?

तो – माझ जाऊ दे. तू कशी आहेस?

ती – कशी दिसते?

तो – प्रश्नाला उत्तर प्रश्न.. आज ही सवय गेली नाही.

ती – माझ्या प्रश्नाच उत्तर तू तरी कुठे दिलस?

तो – बर. मी ठीक आहे आणि तू?

ती – ठीक

तो तीच्या गालावर ओघळणारा थेंब पाहण्यात गुंग झाला होता आणि ती हे पाहून सुखावली होती की आज ही ती नजर तशीच तीच्याकडे पाहते. नेहमी ती बोचणाऱ्या नजरा पाहत असते पण आज त्याची नजर तीला प्रेमाचा, आपल्या माणसाचा एक हळवा आणि हवासा वाटणारा स्पर्श देऊन जात होती. नकळतच त्याच्या तोंडून निघाल.

तो – छान दिसतेस.

पण तीच लक्षच नव्हत. तो पुनःह पण थोड आवाज वाढवून बोलला. आणि ती जागी झाली.

तो – मी म्हंटल खूप छान दिसतेस.

ती – थॅंक यू.

ती -  अरे पण तू इथे कसा?

आणि तीला उत्तर देखील आठवल.

ती - अरे हा वाढदिवस. पण मग मला का नाही सांगितलं? मी पण आले असते.

तो पटकन बोलून गेला

तो - अग माझ्या लक्षातच नाही आल.

अस बोलताच तीची नजर खूप काही बोलून गेली आणि ते वाचण्यासाठी तो अगदी सक्षम होता.

आता विषय बदलण्यासाठी त्याची धडपड चालू झाली.

तो - अग पण तू इतक्या उशीरा येतेस? आणि कुठे आहे नक्की जॉब?

तीला त्याची धडपड कळली आणि हसून तीने ही दुर्लक्ष केल.

ती - हो रोजची वेळ आहे ही आणि जिथे आधी होते आजही तिथेच आहे.

तीने म्हंटलेली ही शेवटची ओळ त्यात विचारलेल्या प्रश्ननाच नाही तर शब्दांच्या आड दिलेला एक संदेश होता. जो संदेश त्याच्या मनाला अगदी भिडला.

तो - एक विचारू?

ती - परवानगीची आजही तुला गरज नाही. विचार.

तो - तुझ नाक आज ही थंड पडत का ग? मला आठवत पावसाळा सुरू झाला की तुझ नाक बर्फासारख गार पडत.

ती हसू लागली आणि तो सुद्धा. थोडा मूर्ख वाटणार प्रश्न जरी असला तरी त्यांचात तो खूप खास होता.

ती - बघ हाथ लावून.

टोकेरी अस नाक त्याच्या टोकाला त्याने बोट लावल आणि खरंच ते थंड पडल होत. दोघेही पुनःह हसू लागले.

ती - तुला ही हुडहुडी भरेल आता. आणखी थोडा वेळ भिजलास तर. आठवत का?

तो - हो

दोघेही त्यांचे क्षण आठवून मनसोक्त हसत होते.

पण नेहमी प्रमाणे तीला कॉल आला. त्याने ते पहिलं आणि त्याला कळल आता तीला निरोप घेण जड जाईल. म्हणून त्यानेच पुढाकार घेतला.

तो - चल घरी जायची वेळ आली.

ती - का? इतकी घाई आहे मला पळवायची?

तो - अस काही नाही, तुला कॉल आला म्हणून मी म्हंटल आणि उशीर ही झाला आहे.

ती - ते तर आहेच.

तो - हव तर पुनःह कधी तरी भेटू.

ती - होईल का कधी अशी भेट? तुला वाटत?.....

थोड्यावेळासाठी दोघे ही शांत राहिले.

 

तो - हो तू सांग. कधी भेटायच?

ती - राहू दे.. मी समजू शकते. आता पहिले सारख आपल आयुष्य नाही राहील आणि हा बदल  तु आणि मी दोघांनी मान्य केल आहे. आणि ठरवून भेटण्यात काही मजा नाही ही अशी योगायोगाने जी भेट घडवली आहे ती आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. या वर्षीचा हा पहिलं पाऊस मी कधीच विसरणार नाही.

तो - मी सुद्धा. हा पहिलं पाऊस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. तुझी आणि माझी मत जुळतात त्यामुळेच आजवर, ना मला तुला काही स्पष्टीकरण द्याव लागल आणि ना तुला मला काही समजवाव लागल. सगळ आपोआप कळत गेल आणि समजत गेल. दैवाने भेट घडवली आपण देखील त्याचा मान ठेवून वेळेवर निरोप घेतला पाहिजे.

ती - मी देखील हेच बोलणार होते. चल मी निघते.

 

अस म्हणून दोघानी हात मिळवला. तब्बल एक मिनिट दोघानी एकमेकांचा हात सोडला नाही.

तेवढ्यात जोरात बसचा हॉर्न वाजला आणि त्यांच लक्ष गेल. दैवाने दिलेला इशारा त्यांना कळला.

तो - चल मी निघतो.

ती - हो.

तो बस मध्ये चढला पण ती तिथेच बस स्टॉपला थांबली. तो दिसेनासा होई पर्यन्त त्या बस मध्ये ती पाहत होती. तो देखील बस मध्ये शेवटच्या सीट जवळ बसला आणि वळून तीला पाहत होता. शेवटी तीने देखील तीच्या घरची वाट पकडली.

दोघेही समजुदार आणि दोघेही आपल्या जबाबदारीला अगदी योग्य आणि प्रामाणिकरित्या पार पाडत होते. एक संथ आणि सरळ आयुष्य चालू होत. पण ही भेट नक्की काय होती? त्यांच्या कर्मावर खुश होऊन दैवाने दिलेली बक्षीस की काही तरी आणखी लिहिल होत नशिबात? कदाच ही एक नव्या कहाणीची सुरुवात होती.