प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एखादा क्षण असतो जो खूप आनंदाचा असतो. तो क्षण कधी ही आणि कोणत्या ही परिस्थिति आठवला तरी चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही. हेच क्षण असतात जे समाधान आणि नशीबवान असल्याच अनुभव देखील करून देत राहतात. माझ्यासाठी असा आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला हॉस्पिटल मधून घरी घेऊन येण्याचा. रात्रंदिवस आजारी आणि मन हेलावून टाकणारे दृश्य बघून जीव कंटाळून गेलेला असतो. त्याच परिसरात आपल्या नितांत जवळची व्यक्ति आजारी असते. म्हणजेच दुष्काळात १३ वा महिना.                      

   

                हॉस्पिटलमध्ये माणसाच्या मनाची खरी परीक्षा होते. परिसर किती ही निराशावादी, निरुत्साही आणि काळीज पिळवटून टाकणारी असो. आपल्याला मात्र आशावादी, स्थिर आणि शांत राहाव लागत. आपल्या मनाला किती ही जोराचे चटके लागो पण आपल्या जवळच्या आजारी व्यक्तीला त्याची कानोकान खबर लागत काम नये. त्या व्यक्तीचे डोळे आणि कान तुम्ही असता तुम्ही जस सांगणार तस् ते जग समजू लागतात. म्हणून आपण बाहेर किती ही वाईट परिस्थिति अनुभवत असलो तरी ही देखील आपण त्यांच्यासमोर गोड देखावा रंगवायचा असतो. ही तारेवरची कसरत म्हणजे खूप वाईट.


                अशा परीक्षितित आनंदचे काही दृश्य पाहायला मिळत असतील तर ते म्हणजे कधी तरी रोगी असलेली व्यक्ति, स्वस्थ होऊन घरी जाण्याच. त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या सोबत असलेल्या नातेवाईकांचा आनंदी आणि समाधानी चेहरा खूप काही सांगून जात असतो. शेजारी असलेले परिवार त्यात आपल पण सुख शोधत असतात आणि कल्पनेत हरवलेले दिसतात. ती कल्पना म्हणजे स्पष्ट दिसणारी "आपण देखील कधी तरी असे घरी जाऊ. आपली व्यक्ती निरोगी आणि स्वस्थ होईल." एक दिवस असतो जेव्हा डॉक्टर सही करून घेतो "तुमच्या व्यक्तीला शस्त्रक्रिया किंवा उपचारा दरम्यान काही ही झाल्यास त्याला हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही" आणि एक हा दिवस असतो "जेव्हा आपली व्यक्ती स्वस्थ होते आणि आपल्या शेजारी बसून आयुष्याला आशेच्या दृष्टीने पाहत असते, नवनवीन स्वप्न रंगवत असते". माझ्यासाठी या पेक्षा आनंदाचा दुसरा दिवस कोणताच नाही.


                आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशे प्रसंग येत असतात. माझ्यासाठी हॉस्पिटल मधले अनुभव आशादायी पण आहेत आणि सत्य परिस्थितीशी ओळख करून देणारे देखील आहेत. तुमच्या देखील आयुष्यात असे प्रसंग असतील. ते कोणत्या गोष्टीशी, वस्तू किंवा जागेशी निगडित आहेत याबद्दल कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.