नेहमीप्रमाणे निवांत घरी जाण्यासाठी निघालो. अंधेरी स्टेशनला ६;३७ ची चर्चगेट ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती. नेहमीचा कोच आणि नेहमीची विंडो सीट भेटली. काही सीट सोडून एक जोडप अगदी जोरजोरात भांडण करत होत. ते दोघ भांडणात इतके गुंग झाले होते की आपण काय बोलतोय? कस बोलतोय? आपल्याला लोक ऐकत आहेत. याच त्यांना भान राहिलेल नव्हत. सवयीप्रमाणे इयरफोन लावून बसलो होतो. गाणी ऐकत नसलो तरी देखील मी इयरफोन वापरतो, तेवढाच आजूबाजूचा आवाज कमी होतो. पण त्यांच भांडण ऐकू येत होतच. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होण्या अगोदर दोघे ही खाली उतरले आणि भांडण ते तर सुरूच होत. त्यांना बघून मनात आलेल विचार म्हणजे.
"कधी कधी नात्यात दुरावा येतो आणि विश्वासाचे धागे सैल होतात. अशा वेळी कदाच समोरच्या व्यक्तिकडून विश्वासाचा धागा सैल पडल्यासारखा कितीही वाटल आणि ती व्यक्ति कितीही दूर निघून गेली असो तरी आपण आपली बाजू सोडू नये. कारण कधी तरी समोरून सोडून गेलेली व्यक्ति त्याच धाग्याच्या आशेवर तुम्हाला शोधत परत येते. आपल्याला त्या नात्यावर, प्रेमावर आणि माणसावर विश्वास ठेवून विश्वासच्या धाग्याच आपल्या हातात असलेल टोक घट्ट पकडून ठेवल पाहिजे. याला काही अपवाद असू शकतात. एखादी व्यक्ति कायमची सोडून गेली असल्यास त्या व्यक्तीची वाट बघण म्हणजे मूर्खपणा. पण छोट्या छोट्या भांडणामुळे, रागामुळे किंवा गैरसमजामूळे नात संपवू नका. खूप नशिबाने कोणी तरी एकच अस आयुष्यात येत तर त्याला जपून ठेवा. आयुष्य हे एकदाच मिळत तसंच अशी व्यक्ति देखील एकदाच मिळते."

0 Comments