अपूरणीय रत्ने म्हणजे आजी-आजोबा

तस तर नशीबवान कोणाला म्हणव अशा माणसांची यादी आपण नकळत बनवत असतो. कधी कोणाला अचानक प्रमोशन मिळाल, कोणी कठीण परीक्षा पास झाल किंवा कोणी बघता बघता श्रीमंत झाल इत्यादि अशा माणसांना  आपण कधी तरी नशीबवान ही पदवी बहाल केली असेलच. तसंच मला देखील ती मूल नशीबवान वाटतात  ज्यांचे आजी आजोबा असतात किंवा ज्याना त्यांच प्रेम, माया आणि सहवास लाभतो.



आता हे अस अचानक या विषयावर लिहण्याच सुचल त्याच कारण देखील सांगतो. ऑफिसमध्ये एक वरिष्ठ व्यक्ति आहेत. ऑफिसच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांचा अनुभव काही महिन्यापूर्वी सगळ्या ऑफिस स्टाफसोबत शेअर केला होता. थोडक्यात खूप गरीब घरातून सुरुवात आणि नंतर खूप मेहनत करून आलेली श्रीमंती, श्रीमंती मनाप्रमाणे जगतच होते की ४०शी ओलांडली आणि वाईट वेळ सुरू झाली, मला जेवढ आठवत त्याप्रमाणे ४९ पर्यन्त खाचखाळग्यातून झालेला प्रवास आणि त्यामध्ये बायकोने दिलेली उत्तम साथ त्यावर त्यांच आयुष्य रेटत ते घेऊन आले. अगदी मृत्यूच्या दारातून देखील परत आले होते. इतका वाईट प्रवास झाल्यानंतर त्यांनी  आयुष्याची नवीन सुरुवात ५०-५१ वयाचे असताना केली आणि हळू हळू लहान लहान यशाची शिखर गाठत, आज वयाची ६५  उलटून गेली आणि पहिले होती त्याहीपेक्षा जास्त श्रीमंती त्यांच्या नशिबी आली. अर्थात त्याच श्रेय ते स्वत घेत नाहीत आणि ते आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच श्रेय देतात.

अर्थात हा प्रवास जो मी ४ - ५ ओळीनमध्ये मांडला तो एवढा सहज आणि सरळ नव्हताच. आणखी एक गोष्ट मला आवर्जून इथे नमूद करावीशी वाटते की त्यांचा मुलगा जो चांगला पगार आणि मोठ्या हुद्यावर मिळालेली नोकरी सोडून  त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ देण्यासाठी परत आला आणि आता दोघेही मिळून सुरू केलेला व्यवसाय सांभाळतात. मला ते खूप नशीबवान वाटतात कारण पैसा या गोष्टीपेक्षा त्यांच्या नशिबी माणसांची श्रीमंती जास्त होती आणि अर्थात त्यांनी पैसा-एके-पैसा जोडण्याआधी माणूस जोडण्यावर जास्त लक्ष दिल.

आता जस मी सुरुवातीला म्हंटल की नशीबवान तो ज्याना आजी-आजोबा असतात किंवा ज्याना त्यांच प्रेम, माया आणि सहवास लाभतो. काही दिवसांपूर्वी मी आणि ती व्यक्ति जेवत होतो. त्यांच जेवण झाल. मी साहस कोणाशी बोलत नाही आणि नेहमीसारखा शांत जेवत होतो आणि रखडलेल भरपूर अस काम कस लवकरात लवकर संपवत येईल याचा विचार करत होतो. त्या व्यक्तीने माझा चेहरा वाचला आणि म्हंटल "काळजी करू नको, होईल सगळ ठीक". मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पहिल त्यांनी पुनःह म्हटल "बाळा अनुभव आहे. हा टेंशन असलेला चेहरा एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत किती तरी वेळा पहिलं आहे म्हणून बोललो." अस म्हणून ते निघाले आणि जाते वेळी खांद्यावर हाथ ठेवून म्हणाले "काळजी करू नको".

इतका धीर आणि समाधान जाणवल त्यांच्या स्पर्शमुळे की जे मी शब्दात सांगू शकत नाही. अगदीच काही क्षणांसाठी वाटल की कोणी तरी आपल्या अश्या व्यक्तीचा स्पर्श झाला. माझ्या नशिबी आजी-आजोबांच प्रेम नाही आणि म्हणून मला कदाच तो स्पर्श आणखी खास असा वाटला. आजी-आजोबा हे नातवंडचे पहिले मित्र-मैत्रीण आणि यांची जागा कोणी घेऊ शकत नाही हे सत्य कोणी ही नाकारू शकत नाही.

आयुष्यभराच्या अनुभवातून काढलेले मौल्यवान धडे देणारी ती जिवंत इतिहासाची पुस्तके आहेत. तेच असतात जे आपल्याला आपल्या मूळ परिवाराच्या मुळांशी, पिढीजात चालत आलेल्या परंपरेशी  जोडून ठेवतात. तेच असतात जे आपल्याला बिनशर्त प्रेम देतात. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला तेच आपल्या जीवनात असणारी खरी संपत्ती आहेत हे  लक्षात येत. म्हणून, त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची कदर करा, कारण ते अपूरणीय रत्ने आहेत जी आयुष्याला आणखी सुंदर बनवतात.

Post a Comment

0 Comments

Facebook Twitter Instagram